नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , दखलपात्र गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या सख्ख्या भावांकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्त – जन समाचार लाइव 24

दखलपात्र गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या सख्ख्या भावांकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्त

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

दखलपात्र गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या सख्ख्या भावांकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्त
पुणे : वानवडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या दोन सख्ख्या भावांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून एक गावठी बनावटीचे पिस्टल, पाच जिवंत काडतुसे, धारदार लोखंडी चाकू व अॅक्टीवा मोपेड असा एकूण १ लाख १२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. १४ मे २०२६ रोजी वानवडी पोलीस स्टेशनचे तपास पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकातील पोलीस अंमलदार अभिजित चव्हाण यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चॉकलेटी रंगाच्या अॅक्टीवा स्कुटरवरून दोन संशयित इसम फिरत असून ते दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्र जवळ बाळगून वावरत आहेत.
या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या परवानगीनंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. त्यावेळी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे साहील रफिक शेख (वय २१, रा. खजुरेवस्ती, राजा बकशार दर्गाजवळ, वैदवाडी, हडपसर, पुणे) व सद्दाम रफिक शेख (वय २५) अशी सांगितली.
त्यांची अंगझडती घेतली असता साहील शेख याच्याकडून धारदार लोखंडी चाकू तर सद्दाम शेख याच्याकडून गावठी पिस्टल, मॅगझिन व पाच जिवंत काडतुसे आढळून आली. तसेच त्यांच्या ताब्यातील अॅक्टीवा मोपेडही जप्त करण्यात आली.
या प्रकरणी वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २१६/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(२५), ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५ राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील व पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता जाधव यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख तसेच पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाने, अभिजित चव्हाण, विठ्ठल चोरमले, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, बालाजी वाघमारे, विष्णु सुतार, अर्शद सय्यद, आशिष कांबळे व कैलास सपकाळ यांनी सहभाग घेतला.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930