क्रिप्टो करन्सी देण्याच्या बहाण्याने बोलावून जबरी चोरी; विमानतळ पोलिसांची कारवाई, एक आरोपी जेरबंद
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
क्रिप्टो करन्सी देण्याच्या बहाण्याने बोलावून जबरी चोरी; विमानतळ पोलिसांची कारवाई, एक आरोपी जेरबंद
पुणे : क्रिप्टो करन्सी देण्याच्या बहाण्याने युवकाला बोलावून मारहाण करत रोख रक्कम, मोबाईल व दुचाकी जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या टोळीतील एका आरोपीस विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. प्रणय अमर बुवा (वय १९, रा. धानोरी-विश्रांतवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ मे २०२६ रोजी फिर्यादी व त्यांच्या मामाच्या मुलाला आरोपी व त्याच्या अन्य तीन साथीदारांनी झिरकॉन सोसायटीजवळ, विमाननगर येथे बोलावले होते. त्यानंतर आरोपींनी दोघांना मारहाण करून १ लाख ४० हजार रुपये रोख रक्कम, दोन मोबाईल फोन आणि एक अॅक्टिव्हा दुचाकी जबरदस्तीने काढून घेतली.
या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्याकडे सोपवला होता. तपास पथकाने तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपास करत आरोपी प्रणय बुवा याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
तपासादरम्यान आरोपीकडून जबरदस्तीने हिसकावून नेलेल्या मालमत्तेपैकी २५ हजार ९४० रुपये रोख रक्कम, ९० हजार रुपये किंमतीचा अॅपल कंपनीचा मोबाईल आणि ५० हजार रुपये किंमतीची अॅक्टिव्हा दुचाकी असा एकूण १ लाख ६५ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-७ पुणे शहर सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग (अतिरिक्त कार्यभार खराडी विभाग) नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेश बोलके यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड तसेच पोलीस अंमलदार लालु कऱ्हे, रुपेश पिसाळ, अंकुश जोगदंडे, राहुल जोशी, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, हरीप्रसाद पुंडे, प्रशांत सुतार आणि सागर कासार यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा





