नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण – जन समाचार लाइव 24

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
पुणे, दि. ११ मे २०२६ : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. एससी आरक्षणाखाली बनावट जातीचे प्रमाणपत्र तयार करून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बिऱ्हाडे दाम्पत्याने सांगितले की, उल्हासनगर महानगरपालिकेतील एका संशयित नगरसेविकेने खोट्या कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जाती (SC) आरक्षणाचा लाभ घेत निवडणूक लढवली असून याबाबत गेले नऊ ते दहा महिने प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ यांच्यासह संबंधित विभागाकडे अनेक वेळा तक्रारी व आरटीआय अर्ज सादर केले, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित नगरसेविका संगीता लखन उर्फ संगीता कंडारे या मागील ३० वर्षांपासून ओपन प्रवर्गातून निवडणूक लढवत होत्या. मात्र यावेळी त्यांनी एससी प्रवर्गातून निवडणूक लढवून विजय मिळवला. त्यामुळे त्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना नानासाहेब बिऱ्हाडे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. पुणे तहसील कार्यालयातील अधिकारी, नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ, मुदगुणे मॅडम तसेच पिंपरी-चिंचवड येथील काही अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली असून कागदपत्रांमध्ये फेरफार झाल्याचाही संशय त्यांनी व्यक्त केला.
बिऱ्हाडे यांनी सांगितले की, संबंधित नगरसेविकेला प्रशासनाकडून एका दिवसात माहिती उपलब्ध करून देण्यात आली, मात्र आम्हाला नऊ-दहा महिने उलटूनही योग्य माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे एससी समाजाला न्याय मिळावा आणि आरक्षणाचा गैरवापर थांबावा यासाठी आम्ही आमरण उपोषण सुरू केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात त्यांच्या वार्डातील पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930