नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , पुण्यात एमडी ड्रग्ज रॅकेट उध्वस्त : ८ आरोपी जेरबंद ; १.१६ कोटींचा मुद्देमाल जप्त – जन समाचार लाइव 24

पुण्यात एमडी ड्रग्ज रॅकेट उध्वस्त : ८ आरोपी जेरबंद ; १.१६ कोटींचा मुद्देमाल जप्त

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

पुण्यात एमडी ड्रग्ज रॅकेट उध्वस्त : ८ आरोपी जेरबंद ; १.१६ कोटींचा मुद्देमाल जप्त

पुणे : वाघोली पोलिसांनी एमडी (मॅफेड्रॉन) अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल आठ आरोपींना अटक केली असून, १ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत २२५ ग्रॅम एमडी अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला असून त्याची किंमत ४५ लाख ६० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दि. १६ एप्रिल २०२६ रोजी रात्री जोगेश्वरी वजनकाटा, थेऊर रोड, केसनंद येथे सार्वजनिक रस्त्यावर अनिस शम्मू सय्यद (वय २८, रा. कल्याणी पार्क, मांजरी बुद्रुक) आणि हरी उत्तम उफाडे (वय ३५, रा. सिद्धार्थनगर, वाघोली) हे दोघे ५ ग्रॅम ५ मि.ग्रॅम एमडी अंमली पदार्थासह आढळून आले. त्यांच्या ताब्यातून १ लाख १० हजार रुपयांचा मॅफेड्रॉन जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान सुमित घुले (रा. मांजरी) आणि बापू होले (रा. लोणीकंद) यांनी संबंधित अमली पदार्थ विक्रीसाठी पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २५९/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त परिमंडळ ०७ सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी तपास वेगाने करण्याच्या सूचना दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चंदन यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली.
तपासात सुमित घुले हा एमडी ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले. तो साथीदार आकाश ढवळे याच्या मदतीने पुणे शहरासह लोणीकंद, कोरेगाव भीमा, शिक्रापूर, कारेगाव, रांजणगाव आणि शिरूर परिसरात एमडीची विक्री करत होता. तसेच २०१६ मधील कुरकुंभ ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विपीनकुमार पंडीत याच्या मदतीने ग्रामीण भागात एमडी तयार करण्याचा कारखाना सुरू करण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी सुमित घुले याला अहमदाबाद येथून अटक केली. त्यानंतर रामनिवास बिश्नोई याला खराडी-थिटेनगर परिसरातून ६३.६२ ग्रॅम एमडीसह पकडण्यात आले. आकाश ढवळे याला कारेगाव येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडून १५९ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला. तसेच विपीनकुमार पंडीत यालाही हडपसर परिसरातून अटक करण्यात आली.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली असून, आरोपींकडून बीएमडब्ल्यू, स्विफ्ट, ग्लॅन्झा यांसारख्या महागड्या वाहनांसह एकूण १ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या मोठ्या सिंडिकेटचे मनसुबे उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चंदन, पोलीस अंमलदार प्रदीप मोटे, शेखर शिंदे, विशाल गायकवाड, गहीनीनाथ बोयणे, महादेव कुंभार आणि राहुल तुपारे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031