नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , कोंढव्यात अंमली पदार्थ विक्रीवर पोलिसांचा मोठा प्रहार; २२ किलो गांजा जप्त, दोघे जेरबंद – जन समाचार लाइव 24

कोंढव्यात अंमली पदार्थ विक्रीवर पोलिसांचा मोठा प्रहार; २२ किलो गांजा जप्त, दोघे जेरबंद

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

कोंढव्यात अंमली पदार्थ विक्रीवर पोलिसांचा मोठा प्रहार; २२ किलो गांजा जप्त, दोघे जेरबंद
पुणे : शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध धंद्यावर कारवाईचा धडाका सुरू असताना कोंढवा परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २२ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल व इतर मुद्देमालासह एकूण ९ लाख ७४ हजार ९६० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०५ राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विक्रेत्यांवर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार दि. २९ एप्रिल २०२६ रोजी परिमंडळ ०५ चे पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांना गोपनीय माहिती मिळाली की, कोंढवा खुर्द येथील शिवनेरीनगर परिसरात एक महिला व एक पुरुष गांजाची विक्री करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार परिमंडळ ०५ पथक व कोंढवा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने गल्ली क्रमांक ३०, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द येथे छापा टाकला. या कारवाईत आरोपी १) यास्मीन करीम शेख (वय ४५) व २) आमिर समीर शेख (वय १९) यांना ताब्यात घेण्यात आले.
छाप्यात आरोपींकडून २१.१९८ किलो गांजा, रोख रक्कम, मोबाईल फोन व इतर साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२८/२०२६ अन्वये एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(क), २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जगताप करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने सहभाग घेतला.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031