नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , मौजमजा करण्यासाठी नागरिकांचे मोबाईल हिसकावणाऱ्या दोन आरोपींना येरवडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या – जन समाचार लाइव 24

मौजमजा करण्यासाठी नागरिकांचे मोबाईल हिसकावणाऱ्या दोन आरोपींना येरवडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

मौजमजा करण्यासाठी नागरिकांचे मोबाईल हिसकावणाऱ्या दोन आरोपींना येरवडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुणे : नागरिकांचे मोबाईल हिसकावून मौजमजा करणाऱ्या दोन सराईत आरोपींना येरवडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद करत तब्बल ४३ मोबाईल फोन जप्त केले आहेत. आरोपींकडून सुमारे २ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
येरवडा पोलीस ठाणे हद्दीतील सह्याद्री हॉस्पिटलसमोरील गल्लीमध्ये एका इसमाचा मोबाईल फोन दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना २९ एप्रिल २०२६ रोजी घडली होती. फिर्यादी इसम रात्री जेवणानंतर शतपावली करत मोबाईल पाहत असताना आरोपींनी मागून येत त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१३/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०४, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस उपायुक्त परिमंडळ ०४ श्री. चिलुमूला रजनिकांत, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री. सुनिल जैतापुरकर तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलीस अंमलदार साईनाथ म्हस्के यांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी चोरी केलेले मोबाईल विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, पोलीस अंमलदार राहुल ठोंबरे व किरण गंभीरे यांनी सापळा रचून संशयितांवर पाळत ठेवली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
१) राजकुमार सोनू पाटील (वय १९, रा. ताडीवाला रोड, बंडगार्डन, पुणे)
२) गौरव बाळू खुडे (वय १८, रा. बिबवेवाडी, पुणे)
अशी आहेत.
आरोपींकडून सुरुवातीला एका पिशवीत १९ मोबाईल फोन मिळाले. चौकशीत त्यांनी पुणे शहर आणि परिसरातून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. निर्जन ठिकाणी महिला व वृद्ध व्यक्तींना लक्ष्य करून त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावणे तसेच पुणे रेल्वे स्टेशनसारख्या गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांच्या खिशातून मोबाईल चोरी करणे, अशी त्यांची कार्यपद्धती असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून एकूण ४३ मोबाईल फोन जप्त केले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड करत आहेत.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त श्री. चिलुमूला रजनिकांत, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुनिल जैतापुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक विजय ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड तसेच तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031