नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणी काळभोर पोलिसांची अवैध मटका जुगार अड्ड्यावर धडक कारवाई – जन समाचार लाइव 24

लोणी काळभोर पोलिसांची अवैध मटका जुगार अड्ड्यावर धडक कारवाई

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणी काळभोर पोलिसांची अवैध मटका जुगार अड्ड्यावर धडक कारवाई

२ लाख ६७ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त; ७ जणांना अटक
पुणे, दि. २५ एप्रिल २०२६ — लोणी काळभोर पोलीसांनी अवैध मटका जुगारावर मोठी कारवाई करत थेऊर फाटा परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत एकूण २,६७,८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ७ जणांना अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, नयन बारजवळ अवैधरित्या ‘सोरट पंतीपाकुळी’ व ‘कल्याण मटका’ जुगार सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.

अटक करण्यात आलेले आरोपी:
सुजित हरी बोडके (वय ३६, थेऊर)
करण सुरेश काळे (वय २९, कदमवाक वस्ती)
विशाल गुंडाप्पा वाघमारे (वय ३०, लोणी काळभोर)
सतिष दिलीप चौडकर (वय ४४, कुंजीरवाडी)
बंटी शंकर गायकवाड (वय २७, लोणी काळभोर)
मंदार सोपान हगवणे (वय ४०, सोरतापवाडी)
शिवाजी बारकु चव्हाण (वय ६३, थेऊर)

जप्त मुद्देमाल:
रोख रक्कम: ₹७,८३०
६ मोबाईल हँडसेट (₹६०,००० किंमत)
४ मोटारसायकली (₹२,००,००० किंमत)
जुगार साहित्य
या प्रकरणातील जुगार अड्ड्याचा मुख्य मालक विकास कांबळे (रा. काळेवाडी) याच्यासह दोन अन्य फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

कारवाईत सहभागी अधिकारी:
ही कारवाई पोलीस उपआयुक्त राजलक्ष्मी शिवणकर व सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे, पोलीस कर्मचारी संदीप जोगदंड, गणेश शिंदे, प्रविण दडस, अशोक गिरी आणि महिला पोलीस माधुरी खोमणे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

या कारवाईमुळे लोणी काळभोर परिसरातील अवैध धंद्यांवर मोठा आळा बसला असून, पुढेही अशाच प्रभावी कारवाया करून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930