नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , वाघोलीत मोबाईल चोरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; १३ मोबाईल धारकांना दिला दिलासा – जन समाचार लाइव 24

वाघोलीत मोबाईल चोरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; १३ मोबाईल धारकांना दिला दिलासा

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

वाघोलीत मोबाईल चोरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; १३ मोबाईल धारकांना दिला दिलासा
वाघोली : वाघोली पोलीस स्टेशन परिसरात वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या पार्श्वभूमीवर वाघोली पोलिसांनी तत्पर कारवाई करत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड आणि क्राईम पीआय पल्लवी मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेतला. या पथकात एएसआय रमेश साबळे, पोलीस कॉन्स्टेबल वृंदावनी चव्हाण आणि पोलीस शिपाई सतीश बिरादार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
तपासादरम्यान विविध ठिकाणी पाठपुरावा करत अखेर १३ चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले. संबंधित मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत सुपूर्त करण्यात आले असून, नागरिकांनी पोलिसांच्या या कार्याचे कौतुक केले आहे.
या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांना चाप बसला असून, मोबाईल चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच नागरिकांनी आपल्या मोबाईलची सुरक्षितता राखण्यासाठी सतर्क राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930