नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , केम–कंदर मार्गाची दयनीय अवस्था; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त – जन समाचार लाइव 24

केम–कंदर मार्गाची दयनीय अवस्था; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

केम–कंदर मार्गाची दयनीय अवस्था; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त
केम (ता. करमाळा) : केम ते कंदर या मुख्य मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून मोठमोठे खड्डे, उखडलेला रस्ता आणि पावसाच्या पाण्यामुळे चिखल झाल्याने वाहनचालक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून दररोज शेकडो वाहने आणि नागरिकांची ये-जा होत असते. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून दुचाकीस्वारांना विशेषतः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा किरकोळ अपघातही घडत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. तसेच रुग्णवाहिका, शाळेची वाहने आणि शेतीमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांना देखील या खराब रस्त्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे या मार्गाच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
लवकरात लवकर केम–कंदर मार्गाची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031