नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , मालमत्ता कर ‘अभय योजना’ एक महिना वाढवण्याची मागणी; अरुण पवारांचे आयुक्त व लोकप्रतिनिधींना निवेदन – जन समाचार लाइव 24

मालमत्ता कर ‘अभय योजना’ एक महिना वाढवण्याची मागणी; अरुण पवारांचे आयुक्त व लोकप्रतिनिधींना निवेदन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

मालमत्ता कर ‘अभय योजना’ एक महिना वाढवण्याची मागणी; अरुण पवारांचे आयुक्त व लोकप्रतिनिधींना निवेदन
पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून थकीत मालमत्ता करधारकांसाठी राबविण्यात आलेली ‘अभय योजना’ ३१ मार्च रोजी संपली असली, तरी तांत्रिक अडचणी व आर्थिक कारणांमुळे अनेक नागरिक या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे ही योजना आणखी एक महिना म्हणजेच ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी समाजभूषण पुरस्कार प्राप्त व श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री वृक्षमित्र राज्यस्तरीय (महाराष्ट्र शासन) पुरस्कार प्राप्त अरुण श्रीपती पवार यांनी केली आहे.
यासंदर्भात पवार यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, तसेच महापौर रवी लांडगे यांना लेखी निवेदन देऊन मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, मार्च महिन्याच्या अखेरीस आर्थिक वर्षाचा शेवट असल्याने अनेक नागरिकांना विविध कामांची गर्दी होती. तसेच तांत्रिक अडचणी व आर्थिक नियोजनाअभावी अनेक इच्छुक नागरिक वेळेत मालमत्ता कर भरू शकले नाहीत. त्यामुळे अभय योजनेला एक महिना मुदतवाढ दिल्यास मोठ्या प्रमाणात नागरिक कर भरण्यास पुढे येतील.
पवार यांनी पुढे नमूद केले आहे की, योजनेची मुदत वाढवल्यास महापालिकेच्या तिजोरीतही मोठ्या प्रमाणात महसूल जमा होईल. तसेच नागरिकांना दंडाच्या जाचातूनही दिलासा मिळेल.
“जनहित आणि महापालिकेचा वाढता महसूल या दोन्ही बाबींचा विचार करता अभय योजनेची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढविणे अत्यंत आवश्यक आहे,” अशी विनंती अरुण पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, या मागणीवर प्रशासन व लोकप्रतिनिधी काय निर्णय घेतात, याकडे शहरातील मालमत्ता करधारकांचे लक्ष लागले आहे

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031