नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणी काळभोर बोरकरवस्ती (ता. हवेली) येथे रिक्षा अपघात; गाईचे मांस सापडल्याने परिसरात खळबळ – जन समाचार लाइव 24

लोणी काळभोर बोरकरवस्ती (ता. हवेली) येथे रिक्षा अपघात; गाईचे मांस सापडल्याने परिसरात खळबळ

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणी काळभोर बोरकरवस्ती (ता. हवेली) येथे रिक्षा अपघात; गाईचे मांस सापडल्याने परिसरात खळबळ

लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील बोरकरवस्ती परिसरात आज सकाळी घडलेल्या रिक्षा अपघातानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, रिक्षामध्ये गाईचे मांस सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित रिक्षा फलटण वरून कोंढव्याच्या दिशेने जात असताना अचानक नियंत्रण सुटल्याने टेम्पो ला जाऊन धडकली. अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता रिक्षामध्ये संशयास्पद पिशव्या आढळून आल्या. त्या उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये गाईचे मांस असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच संबंधित मांस जप्त करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये सुरु आहे तसेच याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. नागरिकांनी अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930