नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , सराईत गुन्हेगाराकडून पिस्टल व जिवंत काडतूस जप्त – जन समाचार लाइव 24

सराईत गुन्हेगाराकडून पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

सराईत गुन्हेगाराकडून पिस्टल व जिवंत काडतूस जप्त
पुणे : न-हे पोलीस स्टेशनच्या हद्दीत सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून त्याच्याविरोधात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ३० मार्च २०२६ रोजी न-हे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे व पोलीस कर्मचारी हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई तसेच संशयित आरोपींची तपासणी करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार देवा चव्हाण व शाहू राठोड यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मानस ग्राऊंड, पुणे येथे एक इसम संशयास्पद हालचाली करत फिरत असून त्याच्याकडे पिस्टल आहे.
ही खात्रीशीर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेथे संशयास्पद हालचाली करत असलेल्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने आपले नाव अमोल पदमाकर सोळंके (वय २४) रा. आरोही सोसायटी, रायकर मळा, धायरी, पुणे असे सांगितले.
पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी पिस्टल व एक जिवंत राऊंड आढळून आले. त्यानंतर त्याच्याविरोधात न-हे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. १२५/२०२६ अन्वये आर्म अॅक्ट कलम ३ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परीमंडळ ३ संभाजी कदम व सहायक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे व पोलीस कर्मचारी संजय शिंदे, निलेश भोरडे, देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोंडे, शाहू राठोड आणि कांतीलाल धोत्रे यांच्या पथकाने केली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031