महिला दिनानिमित्त पीएमपीएमएलकडून ८ प्रसिद्ध पर्यटन बसमार्गांवर विशेष सेवा
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
महिला दिनानिमित्त पीएमपीएमएलकडून ८ प्रसिद्ध पर्यटन बसमार्गांवर विशेष सेवा
पुणे (प्रतिनिधी): पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रविवार, दि. ८ मार्च २०२६ रोजी ८ प्रसिद्ध पर्यटन बसमार्गांवर विशेष वातानुकूलित ई-बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आजच बुकिंग करावे, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्गरम्य स्थळांना भेट देण्यासाठी ही विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पर्यटन बससेवेला प्रवासी व नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रवाशांच्या बुकिंगनुसार बसेसचे नियोजन करण्यात येत आहे.
या विशेष उपक्रमांतर्गत प्रति व्यक्ती केवळ ५०० रुपये या परवडणाऱ्या दरात पुणे परिसरातील विविध पर्यटन स्थळांची सफर घडविण्यात येणार आहे. कुटुंबासह, मित्रपरिवारासह तसेच विशेषतः महिला प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बुकिंग केंद्रे पुढीलप्रमाणे:
१) देहू जिजामाता, २) पुणे स्टेशन, ३) स्वारगेट, ४) मनपा भवन, ५) कात्रज, ६) हडपसर गाडीतळ, ७) भोसरी बसस्थानक, ८) निगडी बसस्थानक.
अधिक माहितीसाठी पर्यटन बससेवेचे समन्वयक श्री. नितीन गुरव (मो. ७४५४०५२६६२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महिला दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या या विशेष पर्यटन उपक्रमाचा महिला व इतर पर्यटकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाने केले आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





