पुरंदर तालुक्यात निर्भय महाराष्ट्र पार्टीची नवी नियुक्ती
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
पुरंदर तालुक्यात निर्भय महाराष्ट्र पार्टीची नवी नियुक्ती
पुरंदर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून निर्भय महाराष्ट्र पार्टीकडून तालुका अध्यक्षपदी नवीन नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या आदेशानुसार मुळ गाव निरे शिवतक्रर (ता. पुरंदर) येथील श्री. सुनील चंद्रकांत मोहळकर यांची पुरंदर तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या अधिकृत नियुक्ती पत्राद्वारे ही घोषणा करण्यात आली.
पक्ष संविधानाच्या अधीन राहून सामाजिक व राजकीय प्रश्नांवर न्याय देणे तसेच पक्ष संघटनेची बांधणी अधिक मजबूत करणे, ही जबाबदारी श्री.मोहळकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे पुरंदर तालुक्यात पक्ष संघटनेला बळकटी मिळणार असून स्थानिक पातळीवर पक्ष कार्याला गती मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा





