ॲल्ब्युरेल’ बनावट औषध विक्रीचा भंडाफोड; पाच ठोक विक्रेत्यांवर गुन्हा
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
‘ॲल्ब्युरेल’ बनावट औषध विक्रीचा भंडाफोड; पाच ठोक विक्रेत्यांवर गुन्हा
पुणे | दि; १ मार्च २०२६ : पुण्यात ॲल्ब्युरेल नावाच्या बनावट औषधाची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पाच वितरक-पुरवठादारांवर गुन्हा दाखल केला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या तपासात ॲल्ब्युरेल नावाचे बनावट औषध बाजारात विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी पुणे, मुंबई, नागपूर आणि रायगड येथील पाच ठोक विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या रॅकेटचा भंडाफोड औषध निरीक्षक श्रुतिका जाधव यांच्या फिर्यादीवरून झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्याच्या पुणे विभागात कार्यरत असलेल्या औषध निरीक्षक श्रुतिका जाधव यांनी २८ जुलै २०२५ रोजी सदाशिव पेठ येथील मे. मैत्री फार्मास्युटिकल्स येथे तपासणी केली. तेथून ॲल्ब्युरेल व रिच्युएक्सरेल या औषधांचे नमुने घेऊन ते शासकीय विश्लेषक, मुंबई यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
शासकीय विश्लेषकांच्या अहवालानुसार ॲल्ब्युरेल हे औषध चाचणीमध्ये अपयशी ठरले असून, ते औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० च्या कलम १७ (ब) अन्वये बनावट घोषित करण्यात आले आहे. तपासादरम्यान या बनावट औषधाची खरेदी-विक्री साखळीत मे. मैत्री फार्मास्युटिकल्स (सदाशिव पेठ, पुणे), मे. श्री साई लॉजिस्टिक (नागपूर), एम/एस नेक्सस लाईफकेअर प्रा. लि. (दादर (पूर्व), मुंबई), एन आर एक्स डिस्ट्रिब्युटर्स एलएलपी ( सायन, मुंबई), एम/एस आरआरटी फार्मा (कामोठे, रायगड) या सर्वांनी संगनमत करून बनावट औषधांची खरेदी-विक्री केल्याचा आरोप आहे. बनावट औषधावर उत्पादक म्हणून नमूद असलेल्या रिलायन्स लाईफ सायन्स प्रा. लि. (नाशिक) यांनी लेखी पत्राद्वारे संबंधित बॅचचे उत्पादन त्यांनी केले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





