नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणी काळभोरमध्ये प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दोघांना अटक – जन समाचार लाइव 24

लोणी काळभोरमध्ये प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दोघांना अटक

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणी काळभोरमध्ये प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दोघांना अटक
लोणी काळभोर (पुणे) – लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर तसेच अन्न व औषध सुरक्षा विभाग यांच्या संयुक्त कारवाईत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार लोणी काळभोर गावातील मे. पवार पान शॉप, पवार हॉटेल्स, खोकलाई देवी चौक येथे बेकायदेशीररित्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा करून विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस व अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे छापा टाकला.
या कारवाईदरम्यान महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या एकूण ₹४७,२९७/- किंमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला तसेच तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी गणेश बाळू भंडलकर व निलेश वसंत पवार (दोघे रा. लोणी गाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-६ डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पो.हवा. वनवे, पो.शि. पाटील तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी बा. ओ. शिंदे, श्रीमती सुप्रिया जगताप यांच्या पथकाने केली.
लोणी काळभोर परिसरातील अवैध धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930