नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , श्रीक्षेत्र थेऊर येथे ‘अजित कृषी प्रदर्शन २०२६’ कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण – जन समाचार लाइव 24

श्रीक्षेत्र थेऊर येथे ‘अजित कृषी प्रदर्शन २०२६’ कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

श्रीक्षेत्र थेऊर येथे ‘अजित कृषी प्रदर्शन २०२६’ कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण
श्रीक्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथे पै. दत्तात्रय उर्फ आबासो काळे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित भव्य “अजित कृषी महोत्सव २०२६” (वर्ष पहिले) या कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्वाचित पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा नेतृत्व जयदादा अजितदादा पवार प्रमुख उपस्थित होते.
८ एप्रिल ते १२ एप्रिल २०२६ दरम्यान श्रीक्षेत्र थेऊर, ता. हवेली येथे होणाऱ्या या भव्य कृषी प्रदर्शनासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना उद्घाटनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमास पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांचीही उपस्थिती होती.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे यांनी सांगितले की, प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात असून सुमारे २०० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय पीक पद्धतींसह पशुपक्षी प्रदर्शनाचाही समावेश करण्यात आला आहे.
या महोत्सवात आंतरराष्ट्रीय शेती अवजारे, दर्जेदार बियाणे, कीटकनाशके, हरितगृहे, कृषी जैविक तंत्रज्ञान, हॉर्टिकल्चर, मासेमारी व अक्वाकल्चर, डेअरी तंत्रज्ञान, शेतमाल प्रक्रिया उद्योग, वेअरहाउस व्यवस्था, अपारंपरिक ऊर्जा, विपणन तंत्रज्ञान, कृषी बाजारपेठ, अर्थसाहाय्य संस्था, सेंद्रिय शेती, शेळी-मेंढी पालन, समूह शेती, शेतकरी बचत गट आणि दुग्धविकास आदी विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याशिवाय कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी, महिला शेतकरी व कृषिकन्यांचा “आदर्श शेतकरी पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास कल्याणकर इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रशांत कल्याणकर, सौ. सीमा प्रशांत कल्याणकर तसेच प्रतिष्ठानचे समन्वयक बापू सोनवणे उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९८५०००१७५५.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031