छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दि. १९/०२/२०२६ रोजी पीएमपीएमएल बस मार्गात तात्बपुरता बदल
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दि. १९/०२/२०२६ रोजी पीएमपीएमएल बस मार्गात तात्बपुरता बदल
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पुणे शहर व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. सार्वजनिक उत्सव मंडळांकडून मिरवणुका काढल्या जातात. दिनांक १९/०२/२०२६ रोजी सालाबादप्रमाणे भवानी पेठेतील भवानीमाता मंदिर येथून शिवप्रतिमेची मिरवणुक दुपारी ४.०० वा. निघणार आहे व शिवाजीपुतळा (सिव्हिल कोर्ट) येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे. या कालावधीमध्ये लक्ष्मी रोड व शिवाजी रोडवरील वाहतूकीमध्ये विस्कळीतपणा निर्माण होत असतो.
यावर उपाययोजना म्हणून वाहतूक पोलीसांकडून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते बस व अन्य वाहतुकीसाठी सायंकाळी सर्व साधारणपणे ०४.०० वाजताचे सुमारास बंद केले जातात. अशा वेळी परिवहन महामंडळाकडून बस संचलनासाठी पर्यायी रस्त्यांचा वापर करण्यात येणार आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे
अ.क्र. मार्ग क्रमांक मार्गातील बदलाबाबतचा तपशील
१ २, २अ, २ब, १०, ११, ११अ, ११क, १३, १७, २१, ३७, ३८, २१६, २९८ व ३५४. या मार्गावरील बसेस जगंली महाराज रोडने बालगंधर्व, डेक्कन, अलका टॉकीज चौकाच्या पुढे कुमठेकर रोड, विश्रामबाग वाडा, मंडई मार्गे स्वारगेट चौकात येऊन पुढे नेहमीच्या मार्गाने जातील.
२ ३५, ३६, ८२, ८७, ८७अ, ९९, १००, १०७, १०९, ११०, ११४, ११५, ११९, १२१, १२२, १२३, १४२, १४५, १५२, १५८, २०४, २०८, २१९, २५६, ३२२, ३२२अ, ३२३, ३२३अ व ३३३. मनपा भवन कडून जाताना शिवाजी पुतळा येथे रस्ता बंद झालेनंतर सदर मार्गांवरील बसेस ढोले पाटील रोड, फर्ग्युसन रोडने संचलनात राहतील. तसेच येताना जंगली महाराज रोडने मनपा भवन अशा संचलनात राहतील.
३ ५, ६, २४, २४अ, ३९, १४०, १४०अ, १४१, १७२, २३५ व २३६. या मार्गांवरील बसेस लक्ष्मी रोड वाहतुकीस बंद झालेनंतर पुणे स्टेशन, पोलीस आयुक्त कार्यालय, वेस्ट एंड टॉकीज, महात्मा गांधी बस स्थानक, गोळीबार मैदान, स्वारगेट व पुढे नेहमीच्या मार्गाने संचलनात राहतील.
४ ३, ९, ५७, ८१, ९४, १०८, १४३, १४४, १४४अ, १४४क, १७४ व २८३. या मार्गांवरील बसेस फडके हौद/दारूवाला पुल वाहतुकीस बंद झालेनंतर पुणे स्टेशन कडे जाताना कुंभारवाडा, जुना बाजार, मंगळवार पेठ या मार्गाने संचलनात राहतील. तसेच या बसमार्गांची वाहतूक पुणे स्टेशन कडून येताना गाडीतळ, कुंभारवाडा, मनपा भवन, डेक्कन जिमखाना व पुढे नेहमीच्या मार्गाने संचलनात राहतील.
५ ७ व २०२. या मार्गाच्या बसेस भवानीमाता मंदिर रस्ता बंद झालेनंतर पुलगेट, गोळीबार मैदान, स्वारगेट, रामेश्वर चौक, कुमठेकर रोड च्या पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील.
६ ८, ९, १८० व १८१. या मार्गाच्या बसेस न.ता.वाडी कडून जाताना कुंभारवाडा, गाडीतळ, पुणे स्टेशन, वेस्ट एंड टॉकीज, महात्मा गांधी बस स्थानक व पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील. तसेच हडपसर व कोंढवा कडून येताना पुल गेट, वेस्ट एंड टॉकीज, पुणे स्टेशन, गाडीतळ, मनपा भवन व पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील.
७ ११३ या मार्गांवरील बसेस दुपारी ३.०० नंतर मनपा नदीकाठी बस स्थानकावरून संचलनात राहतील.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने सायंकाळी ०४.०० नंतर शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते बंद झाल्यानंतर बसमार्गांमध्ये वरीलप्रमाणे बदल करण्यात आलेला आहे. तथापि ऐनवेळी वाहतुक पोलीस विभागाकडून वाहतुकीमध्ये बदल केल्यास त्याप्रमाणे बस संचलन सुरू राहील, याची प्रवाशी नागरिकांनी नोंद घ्यावी व परिवहन महामंडळास सहकार्य करावे असे आवाहन करणेत येत आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





