नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , पीएमपीएमएल कडून महाशिवरात्री निमित्त विशेष बस सेवा – जन समाचार लाइव 24

पीएमपीएमएल कडून महाशिवरात्री निमित्त विशेष बस सेवा

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

पीएमपीएमएल कडून महाशिवरात्री निमित्त विशेष बस सेवा
पुणे, दि. १५ फेब्रुवारी २०२६ :
पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) कडून महाशिवरात्री निमित्त भाविकांच्या सोयीसाठी महत्त्वाच्या बसस्थानकांवरून नियमित तसेच जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी ही विशेष व्यवस्था लागू राहणार आहे.
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शहर व उपनगरातून मोठ्या प्रमाणात भाविक विविध मंदिरांकडे प्रस्थान करतात. विशेषतः निगडी, स्वारगेट, कात्रज, भोसरी, देहूरोड आदी भागांतून निळकंठेश्वर (बी. एस. एफ. सेंटर पानशेत), बनेश्वर (नसरापूर), तसेच शंकरवाडी येथील मंदिर परिसरात जाणाऱ्या मार्गांवर प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पीएमपीएमएलने ही अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून दिली आहे.
प्रमुख मार्ग व नियोजन:
कात्रज बसस्थानक ते बनेश्वर (चेलाडी फाटा)
स्वारगेट ते निळकंठेश्वर (बी. एस. एफ. सेंटर पानशेत)
निगडी (पवळे चौक) ते शंकरवाडी मंदिर पायथा
या मार्गांवर सकाळपासून रात्रीपर्यंत नियमित फेर्‍यांसोबत अतिरिक्त बसगाड्या धावणार आहेत. काही मार्गांवर पहिली फेरी पहाटे ५.३० वा. सुटणार असून, दिवसभर सरासरी २० मिनिटांच्या अंतराने बस उपलब्ध राहतील.
पीएमपीएमएल प्रशासनाने भाविकांनी वेळेचे नियोजन करून बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
महाशिवरात्री निमित्त करण्यात आलेल्या या विशेष नियोजनामुळे भाविकांना सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेवर प्रवास करता येणार असल्याची माहिती वाहतूक व्यवस्थापक यांनी दिली आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930