नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , इयत्ता १०वी व १२वीच्या परीक्षार्थींना पीएमपीएमएलकडून प्रवासासाठी विशेष सुविधा – जन समाचार लाइव 24

इयत्ता १०वी व १२वीच्या परीक्षार्थींना पीएमपीएमएलकडून प्रवासासाठी विशेष सुविधा

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
  • इयत्ता १०वी व १२वीच्या परीक्षार्थींना पीएमपीएमएलकडून प्रवासासाठी विशेष सुविधा
    पुणे — इयत्ता १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) कडून परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी बस प्रवासात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दि. १० फेब्रुवारी २०२६ पासून उच्च माध्यमिक (१२वी – एच.एस.सी.) व २० फेब्रुवारी २०२६ पासून माध्यमिक (१०वी – एस.एस.सी.) परीक्षा सुरू होत असल्याने ही व्यवस्था करण्यात आली आहे.
    परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना वस्तीस्थान ते परीक्षा केंद्र तसेच परीक्षा केंद्र ते वस्तीस्थान या मार्गांवर बस प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रकानुसार नियमित बससेवा सुरळीत चालू ठेवण्यात येईल.
    तसेच, आवश्यकतेनुसार शाळा व्यवस्थापनाच्या सूचनेनुसार अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. यासाठी अधिकारी व पर्यवेक्षकीय सेवकांची नियुक्ती करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना सुरक्षित व वेळेत प्रवास करता येईल, याची विशेष दक्षता घेतली जाणार आहे.
    पीएमपीएमएलने इयत्ता १०वी व १२वीच्या सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930