नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणी काळभोर पोलीसांकडून दोन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस दोन आरोपी अटकेत; एक लाखांचा मुद्देमाल जप्त – जन समाचार लाइव 24

लोणी काळभोर पोलीसांकडून दोन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस दोन आरोपी अटकेत; एक लाखांचा मुद्देमाल जप्त

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गस्तीदरम्यान दोन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे १ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे पुणे–सोलापूर रोडवरील संजय नर्सरी परिसरात गस्त घालत असताना विना नंबर प्लेट असलेल्या दोन मोटरसायकलवरून संशयास्पदरीत्या जात असलेले दोन इसम आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे राज बाळू घाडगे (वय २३, रा. मांजरी बु., पुणे) व किशोर संजू चाफे (वय २३, रा. मुंढवा, पुणे) अशी सांगितली.

सदर इसमांकडे अधिक सखोल तपास केला असता त्यांनी खराडी व लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीतून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून

१) हिरो स्प्लेंडर मोटरसायकल (क्रमांक MH 13 BG 3291),

२) मोटरसायकल क्रमांक MH 27 BD 6171,

तसेच एक मोबाईल हँडसेट असा एकूण सुमारे १,००,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी

लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा र. नं. २६/२०२६ (BNS 303(2))

आणि

खराडी पोलीस स्टेशन गुन्हा र. नं. २९९/२०२५ (BNS 303(2))

असे दोन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना खराडी व लोणीकंद पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आले आहे.

ही कारवाई मा. पोलीस उप आयुक्त राजकुमार शिंदे (परिमंडळ ६, पुणे शहर), मा. सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले (लोणी काळभोर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या यशस्वी कामगिरीत PSI पैठणे, पोलीस अंमलदार आण्णा माने, सुरज कुंभार, राहुल कर्डीले, सचिन सोनवणे, प्रवीण दडस, प्रशांत सुतार व अशोक गिरी यांनी सहभाग घेतला.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930