शिर्डीत ‘बी दि चेंज फाउंडेशन’चा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
शिर्डीत ‘बी दि चेंज फाउंडेशन’चा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात
चंद्रकांत उदगीरे यांना ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’ प्रदान
शिर्डी, दि. ६ सप्टेंबर २०२६ : Be The Change Foundation आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी शिर्डी येथील साई पालखी निवारा येथे मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. या सोहळ्यात ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’, ‘राज्यस्तरीय सौंदर्य कला पुरस्कार २०२६’ तसेच ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ या मानाच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा राज्यस्तरावर सन्मान करण्यात आला. यामध्ये चंद्रकांत उदगीरे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना उदगीरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून सहभागी झालेल्या शासकीय व खासगी कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, कलाकार, उद्योजक तसेच समाजसेवकांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. समाजासाठी सकारात्मक योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा संस्थेचा हा उपक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार मेजर मा. श्री. सुनील मोहोड, अभिनेत्री निवेदिता पगार, श्री. अरुण भंडारे, डॉ. निलेश गायकवाड, ॲड. योगेश दवंगे, श्री. निलेशजी घोडेचोर, शुभांगी थोरात, श्री. प्रवीण मते आणि श्री. अमृत रोहोम आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. मयूर ढोकचौळे व सचिव रचना ढोकचौळे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून नागरिक, शिक्षक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
चंद्रकांत उदगीरे यांना मिळालेल्या ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६’बद्दल उपस्थित मान्यवर व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





