सायबर फसवणुकीतील ₹2 लाख 78 हजार 400 रुपये रिफंड करण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
सायबर फसवणुकीतील ₹2 लाख 78 हजार 400 रुपये रिफंड करण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश
तातडीने केलेल्या पाठपुराव्यामुळे दोन नागरिकांना मिळाला दिलासा
लोणी काळभोर : सायबर फसवणुकीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांच्या खात्यातून गेलेली तब्बल ₹2 लाख 78 हजार 400 रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यात लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाला यश आले आहे.
पहिल्या घटनेत फोकॉन टॉवर्स, रिव्हर सिटी, कदमवस्ती येथील रमेश चंद्रा उपाध्याय (वय 74) यांच्या व्हॉट्सॲपवर अनधिकृतपणे APK फाईल पाठविण्यात आली होती. सदर फाईलच्या माध्यमातून त्यांच्या खात्यातून ₹18 हजार 400 रुपयांचा अनधिकृत व्यवहार करण्यात आला.
दुसऱ्या घटनेत कवडीपाट टोलनाका येथील रंजन यादव (वय 35) हे 16 डिसेंबर 2025 रोजी Google Pay द्वारे आपल्या भावाला पैसे पाठवत असताना अनधिकृतपणे अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर ₹2 लाख 60 हजार रुपये ट्रान्सफर झाले. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर यादव यांनी तातडीने महाराष्ट्र सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार नोंदविली.
दोन्ही प्रकरणांमध्ये लोणी काळभोर पोलिसांच्या सायबर पथकाने संबंधित बँका व मर्चंट यांच्याशी प्रभावी पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश येत दोन्ही अर्जदारांची एकूण ₹2 लाख 78 हजार 400 रुपयांची रक्कम रिफंड करण्यात आली.
रक्कम परत मिळाल्यानंतर अर्जदार रंजन यादव यांनी लोणी काळभोर पोलिसांचे आभार मानले. सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी वेळ न दवडता 1930 हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पथकाची कामगिरी
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) नंदकुमार कोळी, महिला पोलीस अंमलदार उषा थोरात, पोलीस अंमलदार योगेश पाटील आणि महिला पोलीस अंमलदार कौशल्या शिंदे, सायबर तपास पथक, लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांनी केली आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





