नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , थेऊरफाटा रेल्वे उड्डाण पुलावरील खोल खड्ड्यामुळे जड वाहतूक वाहनांना बंदी: सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाहतूक पोलिसांसह इतर विभागाला पत्र – जन समाचार लाइव 24

थेऊरफाटा रेल्वे उड्डाण पुलावरील खोल खड्ड्यामुळे जड वाहतूक वाहनांना बंदी: सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाहतूक पोलिसांसह इतर विभागाला पत्र

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

थेऊरफाटा रेल्वे उड्डाण पुलावरील खोल खड्ड्यामुळे जड वाहतूक वाहनांना बंदी: सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाहतूक पोलिसांसह इतर विभागाला पत्र

थेऊर:अष्टविनायक महामार्गावरील लोणीकंद ते थेऊरफाटा दरम्यान असलेल्या थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या (ROB) पोहोच मार्गावर मोठा व खोल खड्डा पडल्याने सार्वजनिक सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभाग, पुणे यांनी पुणे शहर वाहतूक शाखेला पत्र पाठवून सदर मार्गावरील जड वाहतूक तात्पुरती बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्याची सूचना केली आहे.
हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी सदर पुलावरील पडलेल्या खड्ड्याची पाहणी करून संबंधित बांधकाम विभागाला स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांनी तात्काळ पुलाची पाहणी करून अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद सूचना केले आहेत.

कार्यकारी अभियंता प्रशांत पंडित यांनी पोलीस उपआयुक्त (वाहतूक शाखा) यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, अष्टविनायक महामार्गावरील किमी ५६/०४० येथे असलेल्या रेल्वे उड्डाण पुलावर मोठा खोल खड्डा पडल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर १० मे रोजी करण्यात आलेल्या प्रत्यक्ष पाहणीत सदर खड्डा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट झाले. पुलावरील रस्त्याचा मोठा भाग खचला असून डांबरीकरणाखालील विविध थरही बाधित झाल्याचे पाहणीत आढळले.
या धोकादायक परिस्थितीमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जड वाहतूक तात्पुरती बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्याची मागणी करण्यात आली असून आवश्यक दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या संदर्भातील पत्राची प्रत जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, प्रादेशिक परिवहन अधिकारी, तहसीलदार हवेली तसेच वाहतूक शाखेच्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना माहिती व तात्काळ कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031