नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , थेऊरगावात ‘एक गाव एक शिवजयंती’ उत्साहात; झांज पथक, ढोल-ताशांचा गजर आणि मैदानी खेळांनी जल्लोष – जन समाचार लाइव 24

थेऊरगावात ‘एक गाव एक शिवजयंती’ उत्साहात; झांज पथक, ढोल-ताशांचा गजर आणि मैदानी खेळांनी जल्लोष

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

थेऊरगावात ‘एक गाव एक शिवजयंती’ उत्साहात; झांज पथक, ढोल-ताशांचा गजर आणि मैदानी खेळांनी जल्लोष
पुणे जिल्ह्यातील थेऊरगाव येथे “एक गाव एक शिवजयंती” उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यंदा पाचव्या वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील विविध मंडळे, युवक व ग्रामस्थांच्या सहभागातून हा सोहळा जल्लोषात पार पडला.
शिवजयंती निमित्त गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. झांज पथक व ढोल-ताशांच्या गजरात वातावरण दणाणून गेले होते. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या युवकांनी आणि लहान मुलांनी मिरवणुकीत उत्साहाने सहभाग नोंदवला. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.
या कार्यक्रमात मैदानी खेळांचेही आयोजन करण्यात आले होते. गावातील युवकांनी पारंपरिक खेळांचे सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
“एक गाव एक शिवजयंती” या संकल्पनेमुळे गावातील सर्व समाजघटक एकत्र येऊन शिवजयंती साजरी करत असल्याने सामाजिक ऐक्याचा संदेश दिला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले. थेऊरगावातील ही परंपरा गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने जपली जात असून यंदाही ती उत्साहात पार पडली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031