नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , माघी संकष्टचतुर्थीनिमित्त श्री चिंतामणी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी – जन समाचार लाइव 24

माघी संकष्टचतुर्थीनिमित्त श्री चिंतामणी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

माघी संकष्टचतुर्थीनिमित्त श्री चिंतामणी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

माघ महिन्यातील संकष्टचतुर्थी निमित्त आज श्री चिंतामणी मंदिरात भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पहाटे पुजारी राजेंद्र आगलावे यांच्या हस्ते श्रींची विधिवत पूजा करण्यात आली. चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा संपन्न झाली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त मा. श्री केशव उमेश विद्वांस उपस्थित होते.

भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन देवस्थानच्या वतीने मंदिर प्रांगणात तसेच मंदिराबाहेर मांडव उभारण्यात आले होते. दर्शनबारी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. दुपारी देवस्थानच्या वतीने उपवास करणाऱ्या भाविकांना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले.

सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळाच्या साथीने ह.भ.प. चिंतामणी महाराज तारू यांचे सुभाष्य कीर्तन पार पडले. चंद्रोदयानंतर श्री चिंतामणीचा भव्य छबिना निघाला. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.

भाविकांची जास्त गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन देवस्थानच्या वतीने जादा सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामपंचायतीकडून पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रमावर देवस्थानचे विश्वस्त मा. श्री केशव उमेश विद्वांस स्वतः लक्ष ठेवून होते. धार्मिक उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात माघी संकष्टचतुर्थीचा सोहळा शांततेत पार पडला.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930