नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , सायबर चोरटयाने ऑनलाईन फसवणुक केलेली रक्कम ०२,८६,०६८/-रुपये हस्तगस्त करण्यात लोणीकाळभोर पोलीस ठाणेकडील सायबर पथकास आले यश.. – जन समाचार लाइव 24

सायबर चोरटयाने ऑनलाईन फसवणुक केलेली रक्कम ०२,८६,०६८/-रुपये हस्तगस्त करण्यात लोणीकाळभोर पोलीस ठाणेकडील सायबर पथकास आले यश..

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

नोव्हेंबर २०२५ मध्ये तक्रारदार नामे महादेव महारुद्र कचरे वय-५७ वर्ष, रा. कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर, ता. हवेली, जिल्हा-पुणे यांनी जुना आशयर टेम्पो खरेदी केलेला होता. खरेदी व्यवहाराची रक्कम अदा करण्या करीता तक्रारदार यांनी मन्नपुरम फायनान्स लिमीटेड यांचेकडुन कर्ज घेतलेले होते. सदर कर्जाचे रक्कमेच्या अनुषंगाने तक्रारदार यांना ऑनलाईन अज्ञात इसमाने, तक्रारदार यांचेवरील कर्जाची रक्कम परतफेड करतेवेळी कर्ज रक्कमेत काही टक्के रक्कमेची सुट देण्याचे आमिष दाखवुन त्यांचा विश्वास संपादन केला व त्यांचे बँक खात्यातील रक्कम ०२,८६,०६८/-रुपये ही अन्य बँक खात्यावर ट्रान्सफर करुन घेतली. तक्रारदार हे सदर रक्कम जमा केलेबाबतची माहीती घेण्याकरीता मन्नपुरम फायनान्स ऑफिस येथे गेले असता त्यांना त्यांची रक्कम ही कर्ज खात्यावर जमा न झाल्याची माहीती मिळाली त्यावेळी त्यांची खात्री झाली की, त्यांचे बैंक खात्यातील रक्कम अन्य खात्यामध्ये घेऊन सायबर चोरट्याने त्यांची फसवणुक केलेली आहे. सदर प्रकरणी तक्रारदार यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाणे येथे येऊन त्यांचे तक्रारीची हकिकत सांगितल्याने, श्री. राजेंद्र पन्हाळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकाळभोर पो.स्टे. यांनी सायबर पथकास फसवणुक झालेल्या रक्कमेचा शोध घेणेकामी आदेशित केले. सदर आदेशान्वये सायबर पथकाने तत्काळ तक्रारीची दखल घेऊन तात्काळ तांत्रिक विश्लेषण व ई-मेलव्दारे आवश्यक तो पाठपुरावा करुन नमुद फसवणुक झालेली रक्कमेचा शोध घेतला व तक्रारदार यांची फसवणुक झालेली सर्व रक्कम ०२,८६,०६८/-रुपये परत मिळवुन दिली म्हणुन तक्रारदार यांनी पोलीस खात्याचे उल्लेखनिय कामगिरीवर प्रशंसा व्यक्त करुन लोणीकाळभोर पोलीस ठाणेकडील राजेंद्र पन्हाळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक व सायबर पथकाचे विशेष आभार मानले.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०६, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणीकाळभोर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकाळभोर पोलीस स्टेशन श्री. राजेंद्र पन्हाळे, पो.हवा. देवीकर, पो. अंमलदार बाजीराव वीर, उषा थोरात, यांनी केली आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930